आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या मातीचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. महापुरूषांची अवहेलना हाही युगानुयुगे चालत आलेला विषय! म्हणूनच अनेक प्रतिभावंत कायम दुर्लक्षित राहतात. त्याउलट ज्यांची काहीच योग्यता नाही त्यांना मात्र आपण अनेकदा अकारण डोक्यावर घेऊन नाचतो. लोककवी मनमोहन यांच्या भाषेत सांगायचे तर,
‘‘येथे स्मारके बांधली जातात
कालच्या गझल-कव्वालीवाल्यांसाठी
आणि त्याच डांबरी रस्त्याने
उद्याचा कालिदास असलेला मनमोहन जातो
अनवाणी पायाने
आणि म्हणतो भुरट्या संपादकाला
घेतोस का पाच रूपयांना कविता?
शरम तुला हवी समाजा,
जन्माचे कौतुक
ताटीवर पाय ताणल्यावर का तू करणार?’’
हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी!
कोण आहे हा माणूस? काय केले नाही या माणसाने?
ते मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की, ज्यांची पुस्तके अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये ‘संदर्भ पुस्तक’ म्हणून ठेवण्यात आली. त्यांनी पुस्तकांची शंभरी गाठलीय. त्यात जवळपास 85 कादंबर्या आहेत. जातीसंस्थेचा इतिहास आहे. हे झाले प्रकाशित पुस्तकांचे! अप्रकाशित असलेल्या, अर्धवट लिहिलेल्या अशा कादंबर्या तर त्यांच्या घरात किती मिळतील हे त्यांनाही सांगता येणार नाही. साहित्याची थोडीफार आवड असणार्यांनी त्यांच्या घरी जाऊन एकदा खोदकाम केले पाहिजे.
संजय सोनवणी यांच्याविषयी अनेकांचे मतभेद असतील. ते असावेत. किंबहुना माझेही आहेत. मात्र हा माणूस अतिशय निरागस आहे. निरागसता आणि बुद्धिमत्ता यांचा संगम त्यांच्या ठायी असल्याने त्यांचे माणूस म्हणून असलेले चांगूलपण आपण नाकारू शकत नाही.
त्यांच्या कादंबरीचा नायक चिनी पंतप्रधानांच्या मुलीशी प्रेम जुळवतो, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करतो, मृत्युनंतर ‘कल्की’ बनून जगावर लक्ष ठेवतो, संपूर्ण महाभारत उलटे करतो, छत्रपती संभाजीराजांच्या अटकेपासून हत्येपर्यंतच्या 39 दिवसांचे प्रभावीपणे वर्णन करतो, पानिपतच्या लढाईचे ‘संजया’प्रमाणे वर्णन करतो, अखेरचा हिंदू सम्राट कुमारपालच्या इतिहासाची दखल घेतो, मराठीत प्रथमच ‘क्लिओपात्रा’ ठामपणे मांडतो आणि राजीव गांधींच्या हत्याकांडाची ‘मृत्युरेखा’ही उलगडून दाखवतो. एक-दोन नाही तर तब्बल 85 कादंबर्या त्यांनी लिहिल्या. त्या कादंबर्यांच्या विषयांचा आवाका जरी बघितला तरी सोनवणी यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास वेगळे काही सांगावे लागणार नाही.
या महान कादंबरीकाराने अनेक कथाही तितक्याच ताकदीने लिहिल्या. त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा कथासंग्रह आणि भाषेचे संशोधन आणि अभ्यास करणार्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणारे ‘भाषेचे मूळ’ ही पुस्तके आम्ही ‘चपराक’ तर्फे प्रकाशित केली आहेत. आता त्यांच्या काही कादंबर्या आम्ही पुन्हा वाचकांच्या भेटीस आणत आहोत.
त्यांनी ‘दहशतवादाची रूपे’, ‘भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य’, ‘कार्पोरेट व्हिलेज’, ‘महार कोण होते?’ अशा वेगळ्या विषयांवरील पुस्तकेही लिहिली. महाराजा यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्यावर विपुल लेखन केले. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची ओळख मराठी माणसाला करून दिली. सिंधू संस्कृतीचा इतिहास मांडला. घग्गर नदीवर संशोधनात्मक लेखन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले. इतक्यावर थांबतील तर ते संजय सोनवणी कसले? त्यांनी ‘पुष्प प्रकाशन’ची स्थापना करून अनेक अस्सल पुस्तके प्रकाशित केली. कित्येकांना लिहिते केले आणि लेखक म्हणून सन्मानही प्राप्त करून दिला.
प्रारंभी म्हटल्याप्रमाणे या माणसाने काय केले यापेक्षा काय केले नाही? असा प्रश्न होऊ शकतो. त्यांनी अमेरिकेत कंपनी सुरू केली. जम्मू काश्मीरला जाऊन उद्योग केला. गडचिरोलीत आठ वर्षे पूर्ण तोट्यात कारखाना चालवला. का चालवला? तर त्यांना वाटले, नक्षलवादाला समर्थपणे उत्तर द्यायचे तर आधी त्या लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले पाहिजे. अमेरिकन रेडीओवर मुलाखत दिली. त्यात त्यांना विचारले गेले, ‘जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी देश कोणता?’ भारतीय माणूस या नात्याने त्यांना ‘पाकिस्तान’ असे उत्तर अपेक्षित होते. मात्र यांनी ठामपणे सांगितले की, ‘जगातल्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी देशातून तर मी आता तुम्हाला मुलाखत देतोय.’
अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा वेगवेगळ्या राष्ट्रांवर आजवर मराठीत किती जणांनी असे विपूल लेखन करण्याचे धाडस केलेय? तितका आवाका आणि अभ्यास केवळ संजय सोनवणी यांनी दाखवून दिलाय. म्हणूनच त्यांची पुस्तके इंग्रजीतही ‘बेस्ट सेलर’ ठरली.
संजय सोनवणी यांनी ‘प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी’सुद्धा चालवली. त्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांचा तपास केला. तो लेखनीत उतरवला. मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. अभिनय केला. गाणी लिहिली. संगीत दिले. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरूंगवासही भोगला. व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त होऊनही पुन्हा नव्याने हसत उभे राहिले. जिद्द सोडली नाही.
भूमिका घेणारे लेखक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांनी वाघ्याचे आंदोलन पेटवले. तो पुतळा पुन्हा तिथे बसवायला भाग पाडले.
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर द्वेषातून आरोप सुरू झाले तेव्हा त्यांच्या बाजूने सशक्तपणे लढणारे एकमेव संजय सोनवणी होते. हिंदुत्त्वावादी विचारधारेला विरोध असूनही जे न्याय वाटते तिथे कसलीही अपेक्षा न ठेवता केवळ योग्यायोग्यतेचा विचार करून तटस्थपणे स्वतःला झोकून देणारे संजय सोनवणी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
सोलापूर येथे झालेल्या पहिल्या आदिवासी-धनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी असंख्य व्याख्याने दिलीत. जमेल त्या पद्धतीने सर्वांचे संघटन केले. शेतकरी प्रश्नावर ते तुटून पडतात. ‘ऍट्रॉसिटी कायदा रद्द केला पाहिजे’ म्हणून त्यांनी लढा उभारला. कसलीही पर्वा न करता ते विविध नियतकालिकातून आणि वृत्तवाहिन्यांवरून ठाम भूमिका घेत असतात. आजवर त्यांनी पुस्तकांसाठी म्हणून एकही पुरस्कार स्वीकारला नाही.
एकेकाळी पुण्यात ‘मराठी भाषा मृत्युपंथाला लागलीय का?’ या विषयावर परिसंवाद झाला होता. अजूनही अशी चर्चा सातत्याने होते! पण त्याकाळी इतिहासाचार्य राजवाडे यांनी या चर्चेच्या व्यासपीठावर येऊन ठणकावले, ‘‘अरे, मराठी भाषा मेलीय असे वाटत असेल तर चर्चा कसली करता? तिची तिरडी बांधा आणि स्माशानात नेऊन तिला जाळून टाका! मात्र त्यात थोडीजरी धुगधुगी दिसत असेल तर असे नामर्दासारखे गळे काढत बसू नका. तिच्यात जिद्दीने प्राण फुंका...’’
संजय सोनवणी यांचीही भूमिका अशीच आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांवर फोडले की आपल्याला पापमुक्त झाल्यासारखे वाटते. त्यामुळे संजय सोनवणी कृतिशील आहेत. ते काही बोलत बसत नाहीत. यातच त्यांचे मोठेपण आहे. चांगला विचार देण्यासाठी सत्तेची गरज नसते. नाहीतर स्वामी विवेकानंद सत्तेत गेले नसते का? तसेच काम सोनवणी करत आहेत.
लोककवी मनमोहन यांचा केवळ एक शब्द बदलून त्यांच्याच भाषेत सांगतो,
भविष्यात,
जेव्हा कधी दगडाचे भाव कमी होतील,
तेव्हा,
पुतळा माझा उभारणार्यांनो,
आधी संजय सोनवणी खोदा!!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
एवढं लेखन सोनवणी सरांचं आहे,कमाल आहे हे सगळं करण्यासाठी सर नेमकं दिवसातील किती तास विचार,मनन,लेखन करतात हि सरांकडून शिकण्यासारखी बाब आहे. सलाम त्यांच्या साहित्याला....!!!!
ReplyDeleteअप्रतिम लेख ....
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि वास्तववादी लिखान...
ReplyDeleteआदरणीय संजय सोनवनी सर यांच्यामुळेच आम्ही इतिहासाच्या मुळापर्यंत पोहचतो आणि त्यांच्यामुळेच तर आम्हाला इतिहास ज्ञात होतो.
संजय सोनवनी सर हे कोणी व्यक्ति नसून ती एक विचारधारा आहे.
सर खूपच पोटतिडकीतून लिहीलाय हा लेख तुम्ही । सोनावणी सरांचे व्यक्तिमत्त्व आतिशय प्रग्लभ अभ्यासू दांडगा अनुभव असणारे आहे । चपराकमुळे त्यांच्याशी संवाद साधता आला हे मी माझे भाग्यच समजतो । अभिनंदन आणि येणाऱ्या साहित्यासाठी शुभेच्छ्या । माझी प्रत राखून ठेवावी
ReplyDeleteसंजय सॊनवणी हा एक चमत्कारच मानायला हवा...
ReplyDeleteएक माणूस काय काय करू शकतो याची थोडीफार कल्पना सोनवणी सरांकडे बघितल्यावर येऊ शकेल...
प्रगल्भता या शब्दाची प्रचिती सोनवणी सरांच्या सहवासातच येऊ शकते ...
सर तुमच्यामुळेच संजय सोनवणी यांच्यासमवेत मला भरपूर गप्पा मारता आल्या होत्या, इतका कर्तृत्ववान माणूस असूनही किती साधे ,सरळ आहेत ते, त्यांच्या कार्याची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, आता त्यांची पुस्तके वाचल्यावर परत एकदा भेट घेऊन देण्याची जबाबदारी तुमचीच..
ReplyDeleteअसा व्यासंग,दुर्मिळ. सरांचं काम मोठं आहे
ReplyDeleteसुंदर लेख छान आेळख हे असे पसरायला हवे
ReplyDeleteनिशब्द
ReplyDeleteनिशब्द
ReplyDeleteमहान व्यक्तिमत्व
ReplyDeleteविविधरंगी लिखाणाने आपला ठसा उमटवणारे संजय सर ग्रेटच!
ReplyDeleteखूप छान शब्दात सोनवणी सराचा गौरव केला आहे .
ReplyDeleteखरा मानवतावादी माणूस म्हणून मी सोनवणी सरांकडे पाहतो . अहेतुकी संबंध राखणाऱ्या व्यक्तीचे महत्व कदाचित भविष्याला करायचे असेल म्हणून म्हणून सद्याचे साहित्याचे दलाल आपला नतध्रष्टपणा दाखवत असावेत.
एक अतिशय गरज असलेला हा लेख आहे .
खूप छान शब्दात सोनवणी सराचा गौरव केला आहे .
ReplyDeleteखरा मानवतावादी माणूस म्हणून मी सोनवणी सरांकडे पाहतो . अहेतुकी संबंध राखणाऱ्या व्यक्तीचे महत्व कदाचित भविष्याला करायचे असेल म्हणून म्हणून सद्याचे साहित्याचे दलाल आपला नतध्रष्टपणा दाखवत असावेत.
एक अतिशय गरज असलेला हा लेख आहे .
एसीत बसून झोपडपट्टीतील व्यथा मांडणारे आणि काल्पनिक भराऱ्या मारून साहित्य संसार फुलवणाऱ्या लेखकू मंडळींचे सध्या अमाप पीक येत आहे आणि सध्या त्यांचीच चलती आहे. अशा विरोधी वातावरणात संजय सोनवणी सरांसारखे एक मूल्याधिष्टीत विचारधारा घेऊन लिहिणारे साहित्यिक दुर्मिळ आहेत. त्यामुळेच त्यांच्याविषयी आदर वाटतो. घनश्याम जी, तुम्ही एका व्यासंगी लेखकाचा अगदी अचूक परिचय करून त्यांच्या साहित्यातील योगदानावर प्रकाशझोत टाकला आहे. लेख खूपच छान झाला आहे, आशा प्रकाशबेटांची कोणीतरी दखल घेणे गरजेचे आहे.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteएकदम समर्पक ....
ReplyDeleteखूप सुंदर लेख लिहिला आहे दादा , सोनवणी सर खरच निर्भीड आणि वास्तववादी पर्वा न करता खऱ्यासाठी लढणारा माणूस आहे .
ReplyDeleteसुंदर समर्पक👌
ReplyDeleteसुंदर समर्पक👌
ReplyDeleteघनश्याम सर् आपले पन आभार
ReplyDeleteआपण सोनवणी खोदलेत म्हणून आम्हाला कळाले.अत्यंत साधी राहणी कुठेही अहंकार , गर्व , वागण्या बोलण्यात दिसला नाही .कमी वेळेला मी त्यांना बघितले किंवा भेटले पण इतकं प्रचंड त्यांनी काही केलय हे त्यांच्याकडे आमच्या सारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाला कळणं अवघडंच !! नुसतं लेखन नाही तर समाजासाठीच प्रत्यक्षात योगदान हे लेखणी इतकंच वाखाणण्यासारखं आहे ,गौरवण्यासारखं आहे.!! त्यांचा आशिर्वाद माझ्या काव्यसंग्रह प्रकाशनाला लाभला हे माझं मी भाग्यच समजते. लेख वाचताना पहिले कल्पनाच नव्हती वाचता वाचता मात्र हा वाटत होता म्हणण्यापेक्षा दिसत होता त्यापेक्षा वेगळाच माणूस दिसला, समजला. महान या अवलियाला साष्टांग दंडवत !! आपल्यालाही धन्यवाद !! लेखामुळे ते सामान्यांनाही कळतील ,कळाले असतील .भारावून जायला झालं त्यांच्या कामाचा आवाका पाहून . एकएक पैलू या हि-याचा समजला ! त्रिवार सलाम संजयजी !!💐🙌🏻🙏🏻👍🏻👌🏻
ReplyDeleteHE saheb Mrathi mansachya shauryalaa jagasamor nenyaasaathee,maharashtrachya Victoria Cross,anee swatantra bharatachyaa senadalaateel,sarv marathi alankrut veeranchee olakh vawee mhanun prakash ani awajaache karykram nirmiti karu shakle,anee bharat bharat prasareet kartaa ale tar far mothe kaam hoil.durdaiwane amche itihas tadny adhunik shauryalaa kahi kimat detanaa disat naaheet.Mee tyaanchaa vachak aahe.
ReplyDeleteसंजय सोनवणी ग्रेट आहेतच
ReplyDeleteत्यांना आजपर्यंत केवळ फेसबुक व चपराक च्या प्रकाशात अनुभवत होतो परंतु आज वाचल्यावर सोनवणी सरांचा आवाका लक्षात आला