‘‘बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी अजिबात शंका नाही. त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. मात्र शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे केलेले चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळे त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊ नये,’’ अशी वेडगळ मागणी ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. नेमाडे काय बोलतात यावरून आपली संस्कृती निश्चितपणे ठरत नाही; मात्र आता त्यांना ‘ज्ञानपीठ’सारखा पुरस्कार मिळाला असल्याने त्यांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. उठसूठ वाट्टेल ती विधाने करून आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडविण्याची ज्यांना खोड असते त्यापैकी नेमाडे एक आहेत.
पुण्यात ‘मॅजेस्टिक बुक गॅलरी’चे शानदार उद्घाटन झाले. त्यावेळी समीक्षक डॉ. अविनाश सप्रे आणि नेमाडेंच्याच विद्यार्थीनी डॉ. प्राची गुजर पाध्ये यांनी नेमाडे यांची एक अत्यंत निरस, बोजड मुलाखत घेतली. या कंटाळवाण्या (आणि केविलवाण्याही) मुलाखतीत नेमाडे यांनी अशीच उथळ विधाने केली. स्त्री-पुरूष संबंधाविषयी बोलताना त्यांनी पांडव आणि द्रौपदीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘मोकळ्या संबंधाची परंपरा पुरातन आहे. मात्र नंतर काळानुरूप विवाहाची व्याख्या बदलली. आताच्या काळात विवाहीत स्त्री-पुरूषांना नवरा-बायकोशिवाय एक प्रेयसी-प्रियकर असायला अडचण नसावी. सेक्स रेशो बदलल्यास बलात्कार, व्याभिचाराचे प्रकार थांबतील...’’
‘इतकेच नाही तर हजार मुलामागे आठशे मुली असल्याने बलात्कार वाढल्या’चे सांगत ‘लग्नाशिवाय दोन-तीन पुरूषांशी संबंध ठेवण्यातही काही वावगे नसल्या’चे नेमाडे सांगतात. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना त्यांनी एका आदिवासी भागातील संस्कृतीचे उदाहरण दिले. ‘‘तिथे लग्न होतानाच मुलीला दुसरा नवरा, प्रियकर कोण असेल हे सांगता येते आणि समाजाला त्याचे वावडे वाटत नाही. नवर्याचे अचानक काही बरेवाईट झाले तर आपली काळजी घेणारा, आपले संरक्षण करणारा पुरूष तयार असावा यासाठीची ही प्रथा आहे,’’ असे नेमाडे म्हणाले. भाषेचा, संस्कृतीचा अभ्यासक म्हणून मिरवणारा हा माणूस नक्की काय संदेश देऊ इच्छितो हे वाचकांनी पडताळून पाहायला हवे.
‘बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी शंका नाही पण आमच्या मनातील शिवाजी महाराजांची प्रतिमा वेगळी आहे’ असे सांगणार्या नेमाडेंनी त्यांच्या मनातील शिवाजी महाराज आधी मांडावेत. तुमच्या मनात काय आहे, यापेक्षा सत्य काय आहे हे बाबासाहेबांनी अभ्यासातून मांडले आहे. ज्यांच्या नसानसात शिवाजी महाराज आहेत त्या वंदनीय बाबासाहेबांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही. बाबासाहेबांनी शिवचरित्र घराघरात पोहोचवले आहे. शिवचरित्रावर तुम्ही लिहिलेला एखादा लेखही आम्हास आठवत नाही. त्यामुळे किमान ‘शिवचरित्र आणि बाबासाहेब’ या विषयावर तरी नेमाड्यांसारख्या कुण्या बोजड लेखकाने तारे तोडू नयेत. ‘सगळे आपल्यालाच कळते, असे अधिकारवाणीने कोणी बोलू नये. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात बघावे’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेमाडे यांना सुनावले आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. त्याविषयी मतमतांतरे असू शकतात; मात्र त्या क्षेत्रातील आपला अभ्यास किती हे तरी टीका करण्यापूर्वी पडताळून पाहायला हवे.
नेमाडे एक कादंबरीकार आहेत. त्यांनी साहित्याविषयी बोलावे. नवे लेखक पुढे येण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही करता आले तरी जरूर करावे. कोणत्याही विषयात नाक खुपसून बुद्धिचे प्रदर्शन केल्यास ‘ज्ञानपीठ’सारख्या सन्मानाचाही कचरा होईल.
‘मॅजेस्टिक’च्या कार्यक्रमात मुलाखत घेताना मुलाखतकार नेमाडे कवी म्हणून किती महान आहेत, हेही ठसवू पाहत होते. नेमाडेंनी आजवर सदतीस कविता केल्या; पुढे काव्यलेखन का थांबवले? असे विचारल्यावर नेमाडे म्हणाले, ‘‘मी आणखी पंचवीस कविता केल्यात. प्रत्येक लेखक हा आधी कवी असतो. कवी असल्याशिवाय लेखक होता येत नाही. कविता ही नेणिवेत असते. ती कधीही अश्लिल नसते. कविता येत असूनही पोटाच्या-नोकरीच्या मागे लागल्याने कविता न करण्याचा नीचपणा मी केला. डोक्यातील कादंबर्या लिहून झाल्यावर मी कवितेेकडे वळणार आहे...’’
मुळात नेमाडेंची एकही कविता रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली नाही. नेमाडपंथातले चारदोन टाळके सोडले तर ते कविता करतात हेही कुणाला माहीत नाही. एकीकडे कविता हा सर्वोत्कृष्ट प्रकार आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे (कादंबर्या लिहून झाल्या, रॉयल्टी खिशात टाकली की वेळ मिळालाच तर) कविता करेन असे म्हणायचे हा दुटप्पीपणा आहे. ही विसंगती लाजीरवाणी आहे. हा केवळ नेमाड्यांचा ‘नीचपणा’ नसून त्यांना ‘सहन’ करणार्या रसिकांचाही ‘निलाजरेपणा’ आहे. ‘कविता करणे सोपे आहे; मात्र तुकाराम-कबीरांसारखे धैर्य नाही’ असेही ते सांगतात. तुकाराम-कबीरांसारखे धैर्य सोडा त्यांच्यासारखा एखादा जरी विचार तुम्ही मराठीला दिला असता तरी मराठी लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. बाबासाहेब पुरंदरे यांनी अभ्यासपर्वूक शिवचरित्र मांडले आहे. तसे वाहून घेऊन तुम्ही साहित्याची सेवा केली असती, एखादा विषय मांडला असता तर ते मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टिने अधिक पोषक ठरले असते.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२