संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम चपराक देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरल्याचे वाचक आवर्जून सांगतात. विविध विषयांवर चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भावनेने केलेला लेखनप्रपंच म्हणजे 'दखलपात्र' हा ब्लॉग!!
Saturday, January 19, 2013
'दुर्बलता म्हणजे मृत्यू !'
सामाजिक स्थित्यंतरे बदलत असताना, प्रत्येकाची आत्मविकासाची भावना प्रबळ असावी. ती नसेल तर भौतिक साधनसामुग्रीला शून्य किंमत आहे. 'मी मोठा होणार', 'असामान्य कामगिरी गाजवणार' असे व्यापक ध्येय उराशी बाळगून प्रत्येकाने कृती करायला हवी. आपण हाती घेतलेल्या कार्याविषयी व्यर्थ अभिमानही नसावा आणि न्यूनगंड तर मुळीच नसावा.
ध्येय डोळ्यांसमोर असेल तर ते गाठणे अधिक सुलभ होते. स्वामी विवेकानंद म्हणतात 'दुर्बलता म्हणजे मृत्यू; सामर्थ्य हेच जीवन!' म्हणून प्रत्येकाने सामर्थ्यवान असायला हवे आणि त्या सामर्थ्याची आपणास जाणीवही असायला हवी. आपल्या चांगुलपणाचा लाभ घेत कोणी आपल्याला चिरडू पाहत असेल तर तो त्याचा नाही आपलाच दोष असेल.
पदव्यांचे भेंडोळे घेऊन फिरणा-यांची आज मुळीच कमतरता नाही. समाज सुशिक्षित झालाय; मात्र तो सुसंस्कृत केव्हा होणार? समाजात मोठ्या संख्येने वावरणा-या पदवीधरांचे वर्तन किती भयंकर असते याचा एकदा गांभिर्याने विचार करा. या संपन्न राष्ट्रात अनेक अपप्रवृत्तींनी इतका उच्छाद का मांडलाय याचे उत्तर आपल्याला त्यातून नक्की मिळेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment