संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम चपराक देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरल्याचे वाचक आवर्जून सांगतात. विविध विषयांवर चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भावनेने केलेला लेखनप्रपंच म्हणजे 'दखलपात्र' हा ब्लॉग!!
Thursday, January 17, 2013
श्रीगणेशा
मित्रांनो नमस्कार!
आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेले असताना आम्ही आपल्या साप्ताहिकाच्या द्वितीय वर्धापन दिनापासून हा ब्लॉग सुरु करण्याचे ठरवले. मागच्या काही महिन्यापासून दैनंदिनी लिहित आहेच. आता ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त व्हायचे ठरवले आहे. पत्रकारिता करताना रोज अनेक अनुभव येतात. त्यातील मनाला भावणारे, खूपणारे काही प्रसंग, घटना, मते यावर देण्याचा, मांडण्याचा मानस आहे. माझे परममित्र श्रीपाद भिवराव यांच्या आग्रहावरून हा घाट घातला आहे. 'चपराक' सारखे परखड नियतकालिक चालवताना अनेक गोड, काही कडू अनुभव रोजच येतात. ते आपल्यासारख्या सुज्ञ वाचकांसमोर मांडण्याचा आमचा प्रांजळ प्रयत्न आहे. हा प्रयोग माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. त्यामुले आपल्या सूचना, मते जरुर कळवा.
धन्यवाद!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment