वाचनसंस्कृती कमी होतेय, दिवाळी अंकाचा दर्जा हरवत चाललाय, त्याच्यात साचलेपण आलेय अशी ओरड सुरू असतानाच ‘चपराक’ने प्रत्यक्ष कृतीशीलतेतून या वाचाळवीरांना चपराक देत तब्बल 468 पानांचा महाविशेषांक प्रकाशित केला आहे. यंदाच्या दिवाळी अंकात सर्वात मोठा अंक प्रकाशित करण्याचे धाडस ‘चपराक’ने केले आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय साहित्य आणि नामवंत लेखकांबरोबरच नवोदितांच्या अस्सल साहित्याला दिलेले व्यासपीठ यामुळे दिवाळी अंकाच्या आश्वासक परंपरेत ‘चपराक’ने भर घातली आहे. या विक्रमी अंकाने दिवाळी अंकाच्या वाटचालीत नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
‘चपराक’चा यंदाचा अंक फक्त चाळायचा म्हटला तरी किमान दोन तास लागतील. कोणताही लेख, कथा, कविता वाचून झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इतका गुणात्मक दर्जा टिकवलाय. लेखकांच्या श्रेयनामावलीवर नजर फिरवली तरी या अंकाचे सामर्थ्य लक्षात येईल. सर्व विषयांचा धांडोळा घेणारे अभ्यासपूर्ण लेख, अंकाची उत्तम मांडणी, सुबक छपाई, आकर्षक मुखपृष्ठ यामुळे वाचक या अंकाच्या प्रेमातच पडतात. मराठीत सातशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होत असताना आशय आणि गुणवत्ता या आघाडीवर ‘चपराक’ अव्वल ठरला आहे.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर, मिलिंद जोशी, सदानंद भणगे, पराग करंदीकर, प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, ह. मो. मराठे, नागनाथ कोत्तापल्ले, संजय सोनवणी, श्रीराम पचिंद्रे, वासुदेव कुलकर्णी, डॉ. न. म. जोशी, शेखर जोशी, प्रा. द. ता. भोसले, प्रदीप नणंदकर, महेश मांगले, प्रशांत चव्हाण, डॉ. भास्कर बडे, सरिता कमळापूरकर, चंद्रलेखा बेलसरे, श्रीपाद ब्रह्मे, स्वप्निल पोरे, बी. एन. चौधरी, उमेश सणस, रवींद्र शोभणे, डॉ. सुनीलकुमार लवटे, समीर नेर्लेकर, डॉ. विद्या देवधर, डॉ. सच्चिदानंद शेवडे अशा एकाहून एक 143 साहित्यिकांचा या अंकात समावेश आहे. महाराष्ट्रातील वीस जिल्हे आणि इंदोर, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, बेळगाव आणि थेट दुबईतील साहित्यिकांचाही या दिवाळी अंकात समावेश आहे.
प्रा. मिलिंद जोशी यांचा साहित्य संमेलनाच्या समकालीन वास्तवावर लिहिलेला खुसखुशीत लेख, ह. मो. मराठे यांची व्यंग्यकथा, नागनाथ कोत्तापल्ले आणि व्यंकटेश कल्याणकर यांच्या सारांश कथा, ज्योती कदम यांनी मराठवाड्याच्या तर श्रीराम पचिंद्रे यांनी गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची करून दिलेली ओळख, सुधीर गाडगीळ यांचे अमेरिकेतील मराठी मित्र, भाऊ तोरसेकर यांनी घेतलेला राष्ट्रीय राजकारणाचा वेध तर त्यांच्या पत्नी सौ. स्वाती तोरसेकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी मुस्लिम प्रश्नावर केलेली अभ्यासपूर्ण मांडणी हे सारेच वाचनीय आहे. प्रभाकर येरोळकर, डॉ. मुग्धा जोर्वेकर, शांताराम डफळ, मनिषा वाणी, माधव गिर, दत्तात्रेय वायचळ, नागेश शेवाळकर यांच्या कथा वाचनीय आहेत.
बण्डा जोशी, अजय कांडर, माधव गिर, रेणु पाचपोर, सविता करंजकर, आमीन सय्यद, विद्या बयास, मुरारीभाऊ देशपांडे, आबा महाजन, हणमंत चांदगुडे, ईश्वरचंद्र हलगरे, बाळासाहेब कारले, रूक्मिणी येवले, गोविंद केळकर, वसंत गोखले, देविदास फुलारी, महेश मोरे आदी 48 कवींच्या कविता या अंकाची शोभा वाढवतात. प्रा. बापू घावरे, अरविंद गाडेकर आणि महादेव साने यांची व्यंग्यचित्रे, समीर नेर्लेकर यांनी रेखाटलेली चित्रे आणि मुखपृष्ठ व व्यंकटेश कल्याणकर यांनी केलेली आकर्षक मांडणी हेही या अंकाचे सामर्थ्य आहे.
106 वर्षाच्या दिवाळी अंकाच्या परंपरेत दिवाळी अंकांनी मराठीला अनेक नामवंत लेखक दिले. केवळ मराठी भाषेतच दिवाळी अंकाच्या माध्यमातून अक्षर दिवाळी साजरी केली जाते. ही परंपरा टिकून रहावी, वृद्धिंगत व्हावी या दृष्टिने ‘चपराक’चे कायम प्रयत्न आहेत. संपादक घनश्याम पाटील हे गेल्या चौदा वर्षापासून ‘चपराक’चा दिवाळी विशेषांक प्रकाशित करतात. इतकेच नाही तर अन्य दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी राज्यस्तयीय दिवाळी अंक स्पर्धेचेही आयोजन केले आहे. स्वतः दर्जेदार अंक प्रकाशित करणे आणि इतर अंकांचीही आत्मीयतेने दखल घेणे, त्यांना कौतुकाची थाप देणे यामुळे घनश्याम पाटील आणि ‘चपराक’ यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘साहित्य चपराक’चा हा दिवाळी विशेषांक त्यांनी चपराकच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन विक्रीसाठीही उपलब्ध करून दिला आहे.
या अंकासाठी संपर्क : 020-24460909/7057292092

No comments:
Post a Comment