मराठीत स्त्रियांची चरित्रं आत्तापर्यंत
मोठ्या संख्येनं आली आहेत. मराठी वाचकांकडून त्यांचं नेहमीच जोरदार स्वागत
झालं. सुप्रसिद्ध विनोदी लेखिका शकुन्तला फडणीस यांनी आता यात सकारात्मक भर
घातली असून त्यांचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश
एजन्सीकडून वाचकांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकातून सुप्रसिद्ध
व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस आणि शकुन्तलाबाईंचा जीवनपट सशक्तपणे उलगडला
जाणार आहे. 24 प्रकरणांद्वारे या पुस्तकात फडणीस दाम्पत्याचे विविध पैलू
शकुन्तलाबाईंनी मांडले आहेत. शिदंच्या ‘हसरी गॅलरी’चे अनेक प्रयोग
देशविदेशात झाले असून मराठी वाचकांनी, रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून
दाद दिली आहे. या पुस्तकात शिदंच्या चित्रप्रदर्शनाविषयी, त्यांच्या
आयुष्याविषयी सविस्तरपणे वाचायला मिळेल.
शि. द. फडणीस यांचे मराठी करमणूक विश्वावर अनंत उपकार आहेत. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी व्यावसायिक करमणूक कर माफ करून घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेल्यानंतरही शिदंनी चित्रकलेची वाट धरली. त्यासाठी हट्टाने ते मुंबईला गेले. हास्यचित्रकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1944 साली सुट्टीत सहज म्हणून त्यांनी एक आर्टवर्क केले. त्याकाळी त्यांना त्या कामाचे दहा रूपये मिळाले. हे दहा रूपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली आणि अत्यंत परिश्रमपूर्वक या क्षेत्रात त्यांनी स्वतःला सिद्ध केले.
शिदंचं बालपण, मुंबईतले जे.जे.तले दिवस, शिदंच्या आई, खुद्द शिदंच्या स्वभावाचे सहचर म्हणून शकुन्तलाबाईंना भावलेले पैलू, त्यांची नादिष्ट चित्रे, शकुन्तलाबाईंचं बालपण, त्यांच्या लीना आणि रूपा या दोन्हीही लेकी, शिदंचा चित्रप्रवास आणि फडणीस गॅलरी या सगळ्यांविषयी या पुस्तकात वाचायला मिळेल. शकुन्तला फडणीस या मोजकंच पण सकस लिहिणार्या लेखिका! त्यामुळं ओघवत्या शैलीत त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. या पुस्तकातील अनेक प्रकरणं विविध नियतकालिकांत, दिवाळी अंकात लेख स्वरूपात प्रकाशित झाली असल्याने पुस्तकातही अनेक ठिकाणी काही विषयांची पुनरूक्ती झाली आहे. ती टाळली असती तर पुस्तकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली असती. असे जरी असले तरी यातील कोणतेही प्रकरण वाचताना कुठेही कंटाळवाणं होत नाही. एक विनोदी लेखिका आणि हास्य चित्रकार यांचं चरित्र जाणून घेताना अशा किरकोळ गोष्टी निश्चितपणे गौण ठरतात.
हास्यचित्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असणारे आणि हास्यचित्रांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे शि. द. फडणीस हे मराठी बांधवांचे वैभव आहेत. या दाम्पत्याने आपले आयुष्य या क्षेत्रासाठी पणाला लावले. दोघांचे काम परस्परपूरक असले तरीही क्षेत्र मात्र भिन्न आहेत. अगदी लग्नाच्या आधीपासून ‘केसरी-सह्याद्री’ संस्थेत कार्यरत असल्याने शकुन्तलाबाई शिदंच्या चित्राच्या समीक्षक आहेत. शिदंच्या चित्राविषयी त्या आधीही लिहायच्या आणि लग्नानंतर तर पोळ्या लाटणे सोडून त्या चित्राविषयी चर्चा करायच्या. शकुन्तलाबाईंच्या विनोदी कथा वाचून शि. द. त्या कथांना शीर्षक सुचवायचे. या दोघांच्या सहजीवनातील अनेक प्रसंग शकुन्तलाबाईंनी खुमासदार पद्धतीने मांडले आहेत.
‘एकमेकांविषयी आलटून-पालटून’ हे प्रकरण तर या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग लख्खपणे दाखवून देतं. शिदंचं आणि शकुन्तलाबाईंचं लग्न झालं 1955 साली. त्याआधी शकुन्तलाबाईंची शिदंशी एकतर्फी ओळख होती. म्हणजे शिदंची चित्रं त्या बघत होत्या, बघून हसत होत्या, हसून त्यावर चर्चा करत होत्या. ‘केसरी’साठी त्यावर अभिप्रायही लिहित होत्या. पुढं ते कायमस्वरूपी बंधनात अडकले. चित्र आणि संसारात बेमालूमपणे मिसळून गेलेल्या फडणीस दाम्पत्याची माहिती त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहे. शि. द. मोजक्या शब्दात, नेमकेपणे व्यक्त होणारे. त्याउलट शकुन्तलाबाई कविता, कथा, कादंबर्यांमध्ये रमणार्या. त्यांच्या एका साहित्यिक मित्राने त्यांना सांगितलं, ‘‘तुम्ही घर-प्रपंचात जास्त गुरफटता हे बरोबर नाही. तुमच्या लेखणाकडे तुम्ही अधिक लक्ष द्यायला पाहिजे.’’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांच्या जीवनाचं सार आहे. त्या म्हणतात, ‘‘घरप्रपंचात नाही पण नवर्यात मात्र जरा जास्त अडकते. खरं सांगू? माझ्या इतपत लेखिका पुष्कळ असतील; पण शिदंसारखा चित्रकार एखादाच असेल. कलावंत म्हणून त्यांची ‘तब्येत’ सांभाळणं यात मला जास्त आनंद वाटतो.’’
शिदंना शकुन्तलाबाईंच्या लंब्या, घन्या केसांविषयी फारच प्रेम. त्यांनी शकुन्तलाबाईंना सांगितलं, ‘‘तुझे केस पाहिले अन् नुसता फिदा झालो बघ.’’ पुढे त्या लिहितात, ‘‘आता एवढं ज्या केसाबद्दल प्रेम, त्या केसात माळण्यासाठी कधी गजरा आणायचीसुद्धा त्यांना आठवण नसते. गजरा, आईस्क्रीम, भेळ, शहाळं अन् कधीतरी चांगलसं नाटक इतपतच माझ्या चैनीच्या संकल्पना होत्या. त्यामुळे नवर्याकडून साड्या किंवा दागिणे न मिळाल्याचं दुःख कधी उद्भवलंच नाही.’’
तर त्या केसाबद्दल सांगत होत्या. घरात सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं. सगळी टेबलं, टीपॉय, खुर्च्या यावरही सामानाचे ढीग. शकुन्तलाबाई तिथं खाली बसून केस विंचरत होत्या. नेमका त्यावेळी शिदंना टेस्टर हवा होता. तो सापडत नव्हता. टेस्टर शोधता शोधता ते तिथं आले अन् चक्क त्यांच्या केसावर पाय देऊन पुढे गेले. त्या किंचाळल्या. त्यांनी त्यांच्याकडे धड पाहिलेसुद्धा नाही. ‘सॉरी’ असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत ते पुढं गेले. त्यावर शकुन्तलाबाई लिहितात, ‘‘त्यांच्या डोळ्यापुढे फक्त त्यांना तातडीने हवा असणारा टेस्टरच दिसत होता अन् मला त्यांच्या चेहर्यावर द्रोणाचार्यांची टेस्ट देणारा अर्जुनच साक्षात दिसत होता.’’
‘हसरी गॅलरी’चे उलट-सुलट अनुभवही मजेशीर आहेत. हजारोंच्या संख्येत त्यांना येणारी पत्रं, चित्रांविषयीच्या प्रतिक्रिया सगळंच मुळातून वाचण्यासारखं आहे. चित्रांविषयी असलेली असाक्षरता आणि त्यातून घडलेले विनोद याचेही अनुभव या पुस्तकात आलेत. विनोदी चित्र काढताना कराव्या लागणार्या कसरती, खुद्द त्यांनाही अपेक्षित नसलेले आणि प्रेक्षकांनी काढलेले अर्थ, कोणत्याही चित्रातील अर्थ आणि आशय यापुढे जाऊन ती कलाकृती परिपूर्ण असावी यासाठीचा त्यांचा आग्रह हे सारं शकुन्तलाबाईंनी शैलीदारपणे लिहिलं आहे. ’या कल्पना तुम्हाला सुचतात कशा?’ यावर फडणीस सांगतात, ‘आपल्या सभोवतीच्या दुनियेत इतक्या विसंगती आणि इतक्या चमत्कृती आहेत की यापैकी काही थोड्यानांच ते चित्ररूप देऊ शकतात.’
‘पडद्यामागे’ या प्रकरणात त्यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयातील एक अनुभव दिला आहे. या प्रदर्शनाला स. प. महाविद्यालयाच्या हॉलपासून मधलं पटांगण ओलांडून पार टिळक रस्त्यापर्यंत प्रेक्षकांच्या रांगा लागायच्या. तेथील अभिप्रायासाठी त्यांनी एक टपालपेटी ठेवली होती. त्यात रोज शे-दीडशे खुशीपत्रं जमायची. एकदा त्यात एक निनावी पत्र आलं, ‘प्रदर्शनातला तो बुद्धांचा पुतळा हलवा. तो आमच्या भावना दुखवणारा आहे.’ फडणसीनांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं; मात्र पुन्हा चार दिवसांनी पत्र आलं, ‘मागचं पत्र मिळालं ना? पुतळा अजूनही हलविलेला नाही. ताबडतोब हलवा. नाहीतर गंभीर परिणामाला तयार रहा.’
कसला होता तो पुतळा? एका रेडिओ सेटवर ठेवलेला गौतम बुद्धांचा पुतळा! मात्र त्या पुतळ्याने कानात बोटं घातली आहेत. कपाळाला आठ्या आहेत. चेहराही त्रासिक आहे. शिदंनीच हा पुतळा तयार केलेला. 1956 साली मोहिनी दिवाळी अंकावर प्रकाशित झालेलं हे चित्र. त्यावर्षी गौतम बुद्धांच्या महानिर्वाणाला 2500 वर्षे झाली होती. तो रेडिओचा जमाना होता. अनेकांनी घरातल्या रेडिओवर बुद्धांचा पुतळा हौसेनं मांडला होता आणि इकडं आकाशवाणीवर बुद्धांवरील कार्यक्रमांचा अतिरेक चालला होता. तो ऐकून लोकांना कंटाळा तर आलाच; पण अगदी गौतम बुद्धांच्या पुतळ्यानंसुद्धा वैतागून कानात बोटं घातली अशी ती विनोदी कल्पना होती. त्यावर आक्षेप घेत धमकीसत्र सुरू होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांना त्रास नको म्हणून तो पुतळा काढला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी मांडताना शकुन्तलाबाई लिहितात, ‘शांतीदूत भगवान बुद्धांच्या भक्तांचा हा संतप्त पवित्रा बघून आम्ही मात्र हतबुद्ध झालो.’
गणिताच्या पुस्तकात शिदंच्या चित्राचा झालेला समावेश, गॅलरीतून डोकावताना, काही चित्रांच्या जन्मकथा आणि मुख्य म्हणजे पुस्तकात जागोजागी वापरलेली शिदंची हास्यचित्रे यामुळे हे पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीय झाले आहे. सुरेश एजन्सीच्या शैलेंद्र कारले यांनी फडणीस कुटुंबीय आणि शिदंच्या काही रंगीत हास्यचित्रांचाही पुस्तकात समावेश केलाय. एकंदरीत एका महान मराठी कलाकाराचे चरित्र या पुस्तकामुळे वाचकांसमोर आले आहे. साधी-सोपी भाषा हेही शकुन्तलाबाईंच्या लेखणीचे सामर्थ्य आहे. वाचकांकडून या पुस्तकाचे जोरदार स्वागत होईल याबाबत शंकाच नाही.
पाने - 160, मूल्य - 190
प्रकाशक - सुरेश एजन्सी, पुणे (020-24470790)
* घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२